रेनबो केकसाहित्य : दीड कप मैदा, पाव टी स्पून खाण्याचा सोडा, पाव टी स्पून बेकिंग पावडर, २०० ग्रॅम मिल्क मेड पावडर, ७५ ग्रॅम अमूल बटर, ३ टेबल स्पून पिठीसाखर, पाव टी स्पून व्हॅनिला इसेन्स, खाण्याचे रंग (२ ते ३ आवडीप्रमाणे) अर्धा कप दूध.कृती : प्रथम पसरट भांडय़ात बटर फेटून घ्यावे, नंतर त्यात मैदा फेसून घ्यावा. हे मिश्रण चांगले एकजीव झाल्यानंतर त्यात हळूहळू एकेक पदार्थ टाकून चांगले फेटून घ्यावेत. वरील मिश्रणामध्ये हळूहळू दूध टाकून मिक्स करून, नंतर त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालावा. मिश्रणाचे २-३ वेगवेगळे गोळे करावे, त्यात खाण्याचे रंग मिक्स करावे. भांडय़ाला तुपाचा हात लावून त्यावर मैदा भुरभुरावा व नंतर ओव्हनमध्ये साधारण २०० अंश तापमानावर बेक करावा, साधारण ३० मिनिटे. त्यावर एकेक रंगाचा गोळा व्यवस्थित पसरावा.
कोकोनट केकसाहित्य : अर्धा कप लोणी, अर्धा कप साखर, अर्धा कप मिल्क पावडर, एक तृतीयांश कप दूध, एक तृतीयांश कप डेसिकेटेड खोबरे, १ कप मैदा, १ टी स्पून बेकिंग पावडर, अर्धा टी स्पून खाण्याचा सोडा, पाव टी स्पून स्ट्रॉबेरी इमल्शन, पाव टी स्पून ऑरेंज कलर व इसेन्स आवडीप्रमाणे.कृती : पसरट भांडय़ात लोणी फेसून घ्यावे. त्यात मैदा साखर एकेक करून सर्व साहित्य नीट मिक्स करून घ्यावे. भांडय़ाला तुपाचा हात लावून त्यामध्ये मिश्रण ओतावे. ओव्हनमघ्ये बेक करावे. (तापमान २०० अंश, वेळ अंदाजे २५ ते ३० मिनिटे.)
दुधी भोपळ्याचा केकसाहित्य : १ कप मैदा, अर्धा कप साखर, अर्धा कप मिल्क पावडर, पाव कप तूप/ लोणी, पाव कप दुधी, पाव टी स्पून व्हॅनिला इसेन्स, एक टी स्पून बेकिंग पावडर, पाव टी स्पून खाण्याचा सोडा, आवश्यकतेप्रमाणे दुधाचा वापर करावा.कृती : दुधी भोपळ्याचा किस तुपात चांगला परतवून कोरडा करून घ्यावा. त्यात लोणी फेटून जवळ असलेले साहित्य टाकून मिक्स करून घ्यावे. गरजेनुसार दूध टाकून, ओव्हनमध्ये साधारण १८० ते २०० डिग्री सेल्सिअसवर बेक करावे. अंदाजे ३० ते ३५ मिनिटे.याचप्रमाणे आपल्याला बीटरूटचादेखील वापर करून केक बनविता येतो.
बनाना केकसाहित्य : अर्धा कप लोणी, अर्धा कप साखर, अर्धा कप दूध, अर्धा कप मिल्क पावडर, १ कप मैदा, १ टी स्पून बेकिंग पावडर, पाव टी स्पून सोडा, अर्धा टी स्पून व्हॅनिला इसेन्स, अर्धा कप स्मॅश केलेली केळी. सर्व कृती नेहमीप्रमाणे.
कणकेचा केकसाहित्य : दीड कप गव्हाचे पीठ, एक तृतीयांश कप तूप किंवा लोणी, अर्धा कप साखर, एक कप दूध, १ टी स्पून बेकिंग पावडर, अर्धा टी स्पून सोडा, पाव टी स्पून वेलची पूड.कृती : लोणी प्रथम फेटून घ्यावे. त्यात गव्हाचे पीठ, साखर घालून मिक्स करावे. आवश्यकतेनुसार दूध घालावे. बेकिंग पावडर, सोडा घालून मिक्स करावे, वेलची पावडर टाकावी. हे सर्व मिश्रण अॅल्युमिनियमच्या भांडय़ाला तूप लावून त्यावर थोडा मैदा भुरभरावा व त्यात हे मिश्रण ओतावे. कुकरमघ्ये ठेवताना रिंग व शिट्टी काढून ठेवणे. पाणी न ठेवता अंदाजे २५ मिनिटे बेक करवा.
अॅपल केक : साहित्य : अर्धा कप लोणी, अर्धा कप सफरचंदाचा कीस, अर्धा कप साखर, १ कप मैदा, अर्धा कप मिल्क पावडर, १ टी स्पून बेकिंग पावडर, अर्धा टी स्पून सोडा, पाव टी स्पून व्हॅनिला इसेन्स, आवडीप्रमाणे ड्रायफ्रुटचे तुकडे सजावटीसाठी (आवश्यकतेप्रमाणे दूध).कृती : प्रथम तुपामध्ये सफरचंदाचा कीस परतून घ्या. वरीलप्रमाणे सर्व कृती करून घ्या. ओव्हनमध्ये केक करायला ठेवतेवेळी खाली ड्रायफ्रुटचा थर द्या. वरून मिश्रण ट्रेमध्ये ओता आणि त्यावरूनसुद्धा ड्रायफ्रुटचा थर द्या.
Wednesday, July 1, 2009
Subscribe to:
Posts (Atom)